Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रीय उद्योजक्ता दिनानिमित्त ‘फिफ्टी का फंडा’ स्पर्धेचे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय उद्योजक्ता दिना निमित्त के. सी. ई. सोसायटीचे इन्सिस्ट्युट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च, जळगाव मध्ये विद्यार्थ्यांनी  नवनवीन बिझिनेस आयडिया विषयी  रिसर्च , इनोव्हेशन आणि क्रिएटिव्हिटी ला चालना मिळावी या उद्देशाने ” फिफ्टी का फंडा ” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी विद्यार्थांना मार्गदर्शन करताना राम बायोटेक चे एम. डी.  श्री.पुष्कराज चौधरी यांनी  सांगितले कि, ” बिझिनेस करताना अत्यंत महत्वाचे आहे ते  इंटिग्रिटी म्हणजे अखंडता पाळणं. त्याच बरोबर उद्योजक म्हणून कोणत्या आव्हानांना सामोरे जावं लागते हे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी कंपनी राम बायोटेक चा आता पर्यंतचा प्रवास उलगडला.  उद्योजक म्हणून शिक्षणा बरोबरच लिसनिंग पॉवर, इमॅजिनेशन, व्हिजुअलाझेशन ची पॉवर, क्रिटिकल थिंकिंग सह एकाग्रतेसाठी  ध्यान हे किती महत्वाचे आहे हे  विद्यार्थ्यांना उदाहरण देत  स्पष्ट केले . तसेच उद्योजक म्हणून आपण आपल्या बिझनेस चे  कर्मचारी , ग्राहक,  बिझिनेस ची व्याप्ती या बद्दल कृतज्ञता दाखवून कसे धन्यभागी राहावे हे सांगितले.

स्पर्धेमध्ये बिझिनेस प्लॅन आयडिया प्रेझेन्ट करण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध नवीन बिझिनेस आयडिया प्रेझेंट केल्या ज्यात गिफ्ट एक्सप्रेस, मेडिकल हेल्थ केयर द्रोण, अलम सोप, नटहस्क बार, सिनियर सिटीझन पासून ते वोर्किंग वुमन ला घरपोच ग्रोसरी पाठवण्यासाठी फ्रेंडली ग्रोसरी , इको राइड्स, स्टार्स टूर्स अँड ट्रॅव्हल्स, LED लाईट मॅनुफॅक्चरिंग, ज्युसी कॉस्मेटिक, पी.डी .स्किन्स, सोलर वर चालणारे वेहिकल, फूडकलर व  फुलांपासून ऑरगॅनिक इंक अश्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिस देणाऱ्या, अप्लिकेशन  वेबसाईट , इ-कॉमर्स, ऑनलाईन बिझिनेस असे अनेक नवनविन इनोव्हेस्टिव्ह आयडिया एकूण पंचेचाळीस टीमव्दारा दोनशेहुन अधिक विद्यार्थ्यांनी सादर  केल्या.

या कार्यक्रमाची संकल्पना प्रा. जयश्री चौधरी यांनी मांडली. प्रास्ताविक प्रसंगी डॉ. पराग  नारखेडे यांनी “स्पर्धेमागचे उद्दिष्ट व बिझिनेस करताना उदयोजकला लागणारे स्किल शिक्षण घेताना कशे आत्मसात करावे या बद्दल माहिती दिली.”  इन्सिट्यूट च्या संचालक  डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी विद्यार्थांना आजच्या स्पर्धेच्या युगात स्मार्ट वर्क सोबत हार्ड वर्क करण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच  ज्या विद्यार्थांना उद्योजक या क्षेत्रात आपले अस्तित्व निर्माण करावायचे आहे, अश्या विद्यार्थांनी या स्पर्धामध्ये उत्फूर्तपणे सहभाग नोंदवावा असे आव्हान केले.

या प्रसंगी इन्सिट्यूट च्या संचालक प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे ,अकॅडेमिक डीन प्रा. डॉ. तनुजा फेगडे,  एम.बी.ए. समन्वयक डॉ. पराग  नारखेडे, एम.बी.ए. विभागप्रमुख  प्रा. डॉ. ममता दहाड, कार्यक्रम समन्वयक प्रा. जयश्री चौधरी,  प्रमुख पाहुणे तसेच परीक्षक म्हणून राम बायोटेक चे एम. डी. श्री. पुष्कराज चौधरी आणि रवी प्लास्टिक चे संस्थापक श्री. सागर फालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव चतुरभूज आणि मानसी जगताप यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन मानसी जगताप यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

स्पर्धेमधील विजेते ग्रुप

प्रथम विजेता ग्रुप –  मुब्बशीर & ग्रुप MBA- II , बिझिनेस –  हॉस्पिटीलिटी अॅण्ड अॅस्टोलॅाजी .

द्वितीय विजेता ग्रुप –  गौरी पाटील & ग्रुप MBA- II , बिझिनेस – नट हट्स एनर्जी बार

तृतीय विजेता ग्रुप –  नेहा वागले & ग्रुप MBA- II, बिझिनेस – ऑर्गानिक इंक

चौथा विजेता ग्रुप – कुणाल बिऱ्हाडे & ग्रुप MBA- I, बिझिनेस – ऑलम सोप

Exit mobile version