Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धनगर समाजाच्या वतीने निर्धार मेळाव्याचे आयोजन

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धनगर समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी जय मल्हार सेनेच्या वतीने राज्यव्यापी मोहिम राबविण्यात येत आहे. मुक्ताईनगर येथे धनगर समाजाच्या वतीने शुक्रवार १६ सप्टेंबर रोजी निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून राज्यातील धनगर समाजाने अनेक प्रश्न प्रलंबित आहे. त्याबाबत आवाज उठवून सरकार दरबारी न्याय मिळण्यासाठी जय मल्हार सेनेच्या वतीने राज्यव्यापी मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार येत्या १६ सप्टेंबर रोजी मुक्ताईनगरातील धनगर व मेंढपाळ समाजाचा भव्य निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटना आमदार चंद्रकांत पाटील, खासदार रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत होणार आहे. तर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहूजी शेवाळे हे राहणार आहे. या मेळाव्याला जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन जय मल्हार सेना तालुकाप्रमुख रविंद्र पाचपोळे, बाळू शिंदे, संदीप जुमळे, राजेश जुमळे, सिताराम बिचुकले, संतोष भारसाकळे, शंतकर केसकर, पुंडलीक सरक, भारत मदने, किसन खोंदले, हिरामण येळे यांनी केले आहे.

Exit mobile version