Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे ‘अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे आयेाजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महात्मा गांधी यांचा जन्म दिवस ‘विश्व अहिंसा दिन’ जगभर साजसा केला जातो. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने सोमवारी २ ऑक्टोबर रोजी सकाळी ‘अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे’ आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत अनेक मान्यवरांनी  सहभाग नोंदविला होता.

महात्मा गांधीजींच्या १५५ व्या व लाल बहादूर शास्त्रीजींच्या १२० वी जयंती निमित्ताने आयोजीत ‘अहिंसा सद् भावना शांती यात्रा’ २ ऑक्टोबरला सकाळी लाल बहादूर शास्त्री टॉवरपासून निघून पंडीत जवाहरलाल  नेहरू चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-डॉ. हेडगेवार चौक, नवीन बसस्टॅण्ड मार्गे महात्मा गांधी उद्यानात यात्रा आली. या रॅलीत जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.एन. माहेश्वरी, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, आमदार राजूमामा भोळे, माजी महापौर विष्णू भंगाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, माजी महापौर जयश्री महाजन, महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्यासह जळगाव शहरातील नागरीक, विद्यार्थी यांनी यात्रेत सहभाग नोंदविला होता. यावेळी उपस्थितीतांना गांधीजींचे पणतु मा. श्री. तुषार गांधी हे अहिंसेची शपथ दिली.  रॅलीनंतर महात्मा गांधी उद्यानात होणाऱ्या विश्व अहिंसा दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले.

Exit mobile version