विरोधकांचा प्रयत्न अयशस्वी – राष्ट्रपती पदासाठीचा उभं राहण्यास शरद पवार यांचा नकार

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । भाजपला शह देण्यासाठी विरोधकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणूकित उभं राहण्याचा आग्रह धरला होता. मात्र शरद पवार यांनी त्यास नकार दिला असल्याची माहिती समोर येत आहे.

विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ दि.२४ जुलै रोजी संपत असून त्यामुळे राष्ट्रपती पदासाठी निवडणूक संपन्न होणार आहे. सोमवार, दि.१८ जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार असून त्यासाठी भाजपसमोर तगडं आव्हान निर्माण करण्याचे सर्व विरोधकांचे प्रयत्न आहेत.  त्यांनी यासाठी शरद पवारांना या निवडणुकीत उभे करण्याचा प्रयत्न केला होता पण तो मात्र पवार यांनीच त्यास नकार दिल्याने तो अपयशी ठरला आहे.

उद्या दि. १५ जून रोजी दिल्लीत होणार्‍या २२ विरोधी पक्षांच्या बैठकीआधी ही महत्त्वाची घडामोड घडली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शरद पवार हेच विरोधकांचे उमेदवार असावेत अशी इच्छा आम आदमी पक्षाचे संजय सिंह, शिवसेनेचे संजय राऊत आणि डाव्या पक्षाच्या सीताराम येचुरी या सगळ्यांनी व्यक्त केली होती. त्यासंदर्भात राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी ममता बॅनर्जी या आज ‘6 जनपथ’ या शरद पवारांच्या निवासस्थानी आल्या होत्या. त्यांनी शरद पवारांशी चर्चा केली.

Protected Content