Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फैजपुरचे प्रांत कार्यालय स्थलांतरीत करण्यास विरोध

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । येथील प्रांताधिकारी कार्यालय सावदा येथे स्थलांतरीत करण्याच्या हालचाली सुरू असून याला विरोध करण्यासाठी येथे उद्या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की,यावल व रावेर तालुक्याचा मानबिंदु असलेले उपविभागीय अधिकारी कार्यालय (प्रांतकार्यालय) हे गेल्या सात वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाने फैजपुर येथे मंजूर केले होते. दोन्ही तालुक्यातील जनतेसाठी हे मध्यवर्ती ठिकाण फैजपुर शहाराच्या बसस्थानकापासून हाकेच्या अंतरावर आहे. या कार्यालयामुळे यावल-रावेर तालुक्यात शैक्षणिकदृष्टया शिक्षणाचे माहेरघर असलेल्या रावेर -यावल तालक्यातील जवळपास पाच हजार विदयार्थी शिक्षण
घेत आहे. तसेच न्यायालयीन कामकाजासाठी व विविध प्रकारचे दाखले मिळण्यासाठी व आपल्या परिसरातील शासन दरबारी विविध निवेदन देवुन शासन दरबारी आपल्या समस्या मांडण्यासाठी उपविभागीय कार्यालय शहरात असल्यामुळे नागरिकांच्या अडचणी त्वरीत सोडविण्यात येतात. दरम्यान, फैजपुर येथील उपविभागीय कार्यालया साठी शहरात शासकीय जागा मिळत नसल्याने सावदा येथे जाण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत.याला विरोध करून हा तिढा सोडवण्यासाठी शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरीक यांची बैठक बुधवार दि.३० ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी ५ वा. कृषी उत्पन्न बाजार समिती फैजपुर च्या सभागृहात आयोजित
केली आहे. याला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सर्वपक्षीय पदाधिकारी माजी उपनगराध्यक्ष केतन किरंगे,भाजपा शहाराध्यक्ष संजय रल,काँग्रेस शहराध्यक्ष शे.रियाज शे.साबीर, शिवसेना शहराध्यक्ष अमोल निंबाळे,राष्ट्रवादी शहराध्यक्ष अन्वर खाटीक यांनी केले आहे.

Exit mobile version