Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

परिपत्रकाची होळी करून प्रशासनाच्या कृतीचा विरोध

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेने परिपत्रक काढून सार्वजनिक सुट्या रद्द करून शनिवारची सुटी देखील रद्द केली आहे. या निषेधार्थ आज जळगाव परिमंडळ कार्यालयसमोर दुपारी १.४५ वाजता परिपत्रकाची होळी करून प्रशासनाच्या कृतीचा विरोध करण्यात आला.

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेचे केंद्रीय नेतृत्वाच्या निर्देशानुसार महावितरण कंपनीचे सांघिक कार्यालय मुंबई यांनी कनिष्ठ कार्यालयीन सहायक यांच्या कामकाज संबंधित परिपत्रक क्रमांक ६४४ दि.०५ सप्टेंबर २०२२ जे अन्याय कारक व चुकीच्या पद्धतीने काढण्यात आले आहे.

सार्वजनिक सुट्या रद्द करून शनिवारची सुटी देखील रद्द केली आहे. त्याच्या निषेधार्थ आज सोमवार, दि. १२ सप्टेंबर रोजी जळगाव परिमंडळ कार्यालयसमोर दुपारी १.४५ वाजता सदर परिपत्रकाची होळी करून प्रशासनाच्या कृतीचा विरोध करण्यात आला.

याप्रसंगी संघटनेचे परिमंडळ सचिव कॉ.विरेंद्र सिंग पाटील, केंद्रीय महिला  कार्यकारिणी सदस्य संध्या पाटील, सर्कल अध्यक्ष कॉ.दिनेश बडगुजर, सर्कल संघटक कॉ.विलास तायडे, विभागीय अध्यक्ष जळगाव कॉ.प्रभाकर महाजन, विभागीय सचिव कॉ.किशोर जगताप, कॉ.विशाल न्हाळदे ,कॉ.सचिन फड, कॉ.योगेश कोतवाल यांनी सहभाग घेतला.

Exit mobile version