Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नाथाभाऊंना डावलणाऱ्या सरकारचा निषेध ; विरोधकांची घोषणाबाजी

Eknath Khadse Ajit Pawar.jpg

 

मुंबई (वृत्तसंस्था) नाथाभाऊंना डावलणाऱ्या सरकारचा निषेध असो…, निष्ठावंतांना डावलणाऱ्या सरकारचा निषेध असो…, आयाराम गयारामच्या सरकारचा निषेध असो…., अशा प्रकारच्या घोषणा देत विरोधकांनी चक्क माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्यामुळे विधानसभेच्या प्रवेशद्वारावर एकच हास्यकल्लोळ उडाला होता.

 

विधीमंडळाचे अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विरोधकांकडून घोषणाबाजी सुरुच आहे. आज सकाळी माजी मंत्री एकनाथराव खडसे हे अधिवेशनासाठी सभागृहात येत असताना, विरोधकांनी त्यांच्याकडे पाहून घोषणा सूरू केल्या. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी खडसे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि जयंत पाटील यांनी या घोषणा दिल्या. दरम्यान, विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आजही आंदोलन केले. बजेट फोडल्याचा विरोधकांचा आरोप आहे. याप्रकरणी सायबर क्राईमने चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.

Exit mobile version