Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेर येथे दंगानियंत्रण पथकाचे संचलन

raver

 

रावेर प्रतिनिधी । शहरासह रसलपूर येथे गणेशोत्सव आणि मोहरम या उत्सवांच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस दंगानियंत्रण पथकाने आज दि. 5 सप्टेंबर रोजी सकाळी पथसंचलन केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर पोलीस ठाण्याअंतर्गत शहरातील परिसरात कायदा, सुव्यवस्था कायदा आणि अबाधित राहावी, यासाठी आज सकाळी हे पथसंचलन अप्पर पोलीस अधिक्षीका भाग्यश्री नवटक्के, उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, पोलिस उपनिरीक्षक सुनील कदम आणि मनोज वाघमारे यांच्यासह पोलीस, दंगाकाबू नियंत्रण पथक, गृहरक्षक दलाचे येथील पोलीस ठाण्यापासून आंबेडकर चौक, मेन रोड, चावडी भाग, नागझिरी भाग, स्वामी विवेकानंद चौक, शिवाजी चौक, भोई वाडा, गांधी चौक अंबिका व्यायाम शाळा आदी शहरातील प्रमुख मार्गावरून पथसंचलन करण्यात आले असून रसलपुर येथेही पथसंचलन करण्यात आले आहे.

Exit mobile version