Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोऱ्यात खुली राज्यस्तरीय पुरुष बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । पाचोरा बास्केटबॉल गृपतर्फे “मैत्री चषक” खुली राज्यस्तरीय पुरुष बास्केटबॉल स्पर्धा 17 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन आ. दिलीप वाघ यांच्या हस्ते करण्यात येणार असुन याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन पोलिस उपअधीक्षक भारत काकडे, पाचोरा तालुका शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, व्हाईस चेअरमन विलास जोशी, मानद सचिव अॅड. महेश देशमुख, एम. एम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वासुदेव वले, नगराध्यक्ष संजय गोहील, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल उपाध्यक्ष जयंत देशमुख, सिद्धीविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. स्वप्निल पाटील, विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. भुषण मगर (पाटील), आशिर्वाद इन्फ्राचे संचालक मुकुंद बिल्दीकर, अमित पाटील, पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, नगरसेवक बशीर बागवान, मा. क्रिडा संचालक मालोजीराव भोसले, प्रदिप मराठे, मुन्ना गौड, वाल्मिक शहापुरे हे असणार आहेत.

“सहवास जरी सुटला, स्मृती सुगंध देत राहिल, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहिलं” या ब्रीदवाक्याच्या संकल्पनेतुन शहरातील शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालयाच्या प्रांगणावर पाचोरा बास्केटबॉल गृपतर्फे आपल्या जिवाभावाचे मित्र दिवंगत स्व. जावेद बागवान, स्व. नितीन मराठे, स्व. अजय गौड, स्व. दिपक शहापुरे यांच्या स्मरणार्थ गेल्या ८ वर्षांपासून बास्केटबॉल स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. त्याच अनुषंगाने दि. १७ फेब्रुवारी सायंकाळी ७ वाजेपासून “मैत्री चषक” खुल्या राज्यस्तरीय पुरुष बास्केटबॉल स्पर्धेस प्रारंभ होणार असून या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक येथील सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. स्वप्निल पाटील यांच्यातर्फे ३१ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. भुषण मगर (पाटील) यांच्यातर्फे २१ हजार रुपये, तृतीय पारितोषिक अमित पाटील यांच्यातर्फे ११ हजार रुपये तर आशिर्वाद इन्फ्राचे संचालक मुकुंद बिल्दीकर यांच्यातर्फे वैयक्तिक बक्षिसे दिली जाणार आहेत. या प्रकाश झोतात खेळविल्या जाणाऱ्या खुल्या राज्यस्तरीय पुरुष बास्केटबॉल स्पर्धेत नागपूर, घाटकोपर (मुंबई), अमरावती (३), नांदेड, औरंगाबाद (३), डेक्कन पुणे, कारंजा, रेल्वे बाईज (मुंबई), पाचोरा, चाळीसगाव, इंदौर या सह १६ संघांनी आपला प्रवेश निश्चित केला असुन तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेकरिता आलेल्या खेळाडुंच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात आली आहे.

 

Exit mobile version