पाचोरा प्रतिनिधी । उद्या ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त पाचोरा शिवसेना युवसेनातर्फे खुली निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे
या खुल्या निंबध स्पर्धेचा “माझे शिक्षक” हा विषय आहे. या स्पर्धेत विजेत्यास प्रथम पारितोषिक म्हणून ५ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक ३ हजार रुपये, तृतीय पारितोषिक २ हजार रुपये तर उतेजनार्थ प्रत्येकी ५०० रुपये (१० उत्तेजनार्थ पारितोषिके) तसेच सहभागी स्पर्धकास प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेत समाविष्ट स्पर्धकांनी निबंध हा स्वतः च्या अक्षरात लिहून बंद लिफाफ्यात स्वतःचे नाव, मोबाईल नंबर, व पत्ता नमूद करुन दि. ११ सप्टेंबर २०२१ संध्याकाळी ५ वाजे पर्यंत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील “शिवतीर्थ” शिवसेना कार्यालय, पाचोरा येथे जमा करावे. असे आवाहन युवासेनेतर्फे करण्यात आले आहे.