Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

काम करायचे असेल तरच पदे घ्या (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी । पद शोभेसाठी मिरवू नका, तर काम करायचे असेल तरच पद घ्या, अन्यथा पदे सोडा असा राष्ट्रीय नेते राहूल गांधी यांचा आपण संदेश घेऊन आल्याचे नॉर्थ महाराष्ट्र युवक काँग्रेस व राष्ट्रीय युवक सचिव प्रियांका सानप यांनी सांगितले.

त्या जिल्हा काँग्रेसतर्फे आयोजित ‘रोजगार दो’ मेळाव्यात कार्यकर्त्यांना उद्देशून बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, राहुल गांधीं यांनी अधिकाधिक युवकांना काम करण्यासाठी सहभागी करून घेण्याचा संदेश दिला आहे. त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टिका केली. आज ४० करोड युवा बेरोजगार आहेत. याना रोजगार देणार कोण ? सरकारी कंपन्या विकल्यामुळे तरुण बेरोजगार झाले आहेत. भविष्यात यापेक्षाही बिकट परिस्थिती होणार आहे.पंतप्रधान मोदी यांनी युवकांना रोजगार द्यावा अन्यथा राजीनामा द्याव अशी मागणी प्रियांका सानप यांनी केली.

याप्रसंगी प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस मुक्तदीर बाबा देशमुख, जिल्हा युवक अध्यक्ष प्रा. हितेश पाटील, धनंजय शिरीष चौधरी, इमरान खान, मुजीब पटेल, दिपक राजपूत, नीरज बोराखेडे, वसीम जनाब, किरण पाटील, इमरान खान, अनिल राऊत, संदिप पाटील, अंबादास गोसावी, प्रवीण पाटील, पराग घोरपडे आदी उपस्थित होते.

चोऱ्या कशा करायच्या हे भाजपकडून शिकावे. पंतप्रधान मोदी यांनी काळे धन तर भारतात आणले नाही पण इथलेच धन घेऊन निरव मोदी, मल्ल्या, चोक्सीला नेऊ दिले. मोदी हे व्यापारी आहे, ते देशात व्यापार करीत आहे. सरकारी संस्था विकत असून मोदी अदानी, अंबानीला विकत आहेत.तरुणांना रोजगार कसा देणार ? काहीतरी निरर्थक विषय काढून लोकांना भरकवटत आहेत. युवकांनी आता भाजपचा कावा ओळखावा आणि रोजगार दो म्हणून मागणी करावी. असे आवाहन युवक अध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांनी केले.

Exit mobile version