Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

परवानाधारक कृषि केंद्रावरूनच बियाणे खरेदी करा; जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर

sambhaji thakur

sambhaji thakur

जळगाव सचिन गोसावी । शेतकरी बांधवानी शासनाच्या निर्देशनानुसार परवानाधारक कृषि केंद्रावरूनच बियाणे खरेदी करावी तसेच कापूस लागवडीपुर्वी पुर्व मशागत केल्यानंतर १ जून नंतर लागवड करा, त्याचप्रमाणे अनावश्यकरित्या रासायनिक खतांचा मारा व फवारणी करून अर्थिक नुकसान करून घेवू नये असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी आज मंगळवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलतांना केले आहे. 

गेल्या महिन्यात अमळनेर शहरात विनापरवाना बियाणे विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने कृषि विभागाच्या पथकाने कारवाई करत दुकान सीलबंद केले होते. दरम्यान महिन्याभरानंतर दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेला आहे. विनापरवाना बियाणांची उगवण क्षमता ही कमी असते. अश्या बियाणांमुळे शेतकऱ्यांचे वर्षभराचे नुकसान होते. पेरणीची वेळही निघून गेलेली असते अश्या वेळी शेतकरी बांधवानी परवाना धारक असलेल्या कृषि केंद्रातूनच पेरणीसाठी लागणारे बियाणे खरेदी करावे, असे आवाहन जिल्हा कृषि अधिक्षक संभाजी ठाकूर यांनी केले. 

ते पुढे म्हणाले की, त्यापुर्वी मातीचे परिक्षण करून घेणे गरजेचे आहे. कापूस लागवड करतांना सोबत कमी प्रमाणात युरिया रासायनिक खतांचा मात्रा द्यावा, त्यानंतर आवश्यकतेनुसार पुढील खते देण्यास सुरूवात करावी असे देखील जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ठाकूर यांनी सांगितले.

Exit mobile version