शासकीय रूग्णालयातून मिळणार फक्त जेनरिक औषधीचे प्रिस्कीप्शन !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शासकीय रूग्णालयातून यापुढे फक्त जेनरीक औषधींचे प्रिस्कीप्शन मिळणार असून याचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा केंद्र सरकारने दिला आहे.

केंद्रीय सेवांचे महासंचालक डॉ. अतुल गोयल यांनी १२ मे रोजी परिपत्रक काढले असून याच्या माध्यमातून केंद्र सरकारी दवाखान्यातील, सेन्ट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम वेलनेस सेंटर्समधील तसेच पॉलिक्लिनिक्समधील डॉक्टरांना निर्देश देण्यात आले आहेत की, त्यांनी इथं येणार्‍या रुग्णांना केवळ जेनेरिक औषधेच लिहून दिली पाहिजेत.

सरकारच्या या निर्देशांचे पालन सर्व सरकारी रुग्णालयांतील सर्व आजारांच्या विभाग प्रमुखांनी केलं पाहिजे. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार्‍या निवासी डॉक्टर देखील याचं पालन करत आहेत की नाही हे ही त्यांनी तपासलं पाहिजे. जर याचं पालन होत नसल्याचं दिसून आलं तर संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्यात येईल, असंही या परिपत्रकात नमूद केले आहे. याबाबत यापूर्वीही निर्देश देण्यात आले असले तरी डॉक्टरांमार्फत अद्यापही ब्रॅन्डेड औषधेच लिहून दिली जात असल्याचं निदर्शनास आलं आहे, या पार्श्‍वभूमिवर नव्याने जारी करण्यात आलेले परिपत्रक लक्षणीय मानले जात आहे.

Protected Content