Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ऑनलाईन उतारे अपडेट नसल्यामुळे नागरीकांना आर्थिक भुर्दंड ; निवेदनाव्दारे लक्ष देण्याची मागणी

 

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील तालुका भुमी अभीलेख कार्यालयाच्या माध्यमातुन मिळणारे ऑनलाईन उतारे हे अपडेड झाले नसल्याने नागरीकांना आर्थिक भुर्दंड सोसावे लागत आहे. या नागरी हिताच्या प्रश्नाकडे भुमि अभिलेख कार्यालयाच्या उप अधिक्षकांनी तात्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष जुगल पाटील व शहराध्यक्ष आकाश चोपडे यांनी एका निवेदनाद्वारे तालुका भुमि अभिलेख उपअधिक्षक मुकुल तोटावार यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की, नागरीक हे आपल्या मिळकतीचे सुविधा केन्द्र अथवा ईतर ठीकाणी ऑनलाईन उतारे काढत असतांना सदरचे उतारे हे यावल तालुका भुमि अभिलेख कार्यालयातुन अपडेट झाले नसल्याने सदरचे उतारे हे निरंक ( कोरे ) निघत असल्याने नागरीकांना आर्थिक भुर्दंडचा फटका बसत आहे .आपल्या कार्यालयातुन शासकीय शुल्क फी आकारणी करून नागरीकांना मिळणारे मिळकतीचे उतारे हे तात्काळ अपडेट करून देण्याचे कार्य हे पुर्वरत करावे, जेणे करून सर्वसामान्य नागरीकांना ऑनलाईनचे काढण्यासाठी होणाऱ्या आर्थिक भुर्दंडला टाळता येईल अशी मागणीचे निवेदन तालुका भुमि अभिलेख उपअधिक्षक मुकुल तोटावार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष जुगल पाटील, शहराध्यक्ष आकाश चोपडे, शहर उपप्रमुख दुर्गश कोळी, विद्यार्थी सेनेचे विपुल येवले, कुणाल गजरे, समीर शेख, जयेश सुरवाडे आदीच्या स्वाक्षरी आहे.

याबाबत यावल तालुका भुमिअभिलेख कार्यालयाने तात्काळ निर्णय घेवुन मिळकत उतारे अपडेट न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातुन आंदोलन छेडण्यात येइल असा ईशारा देण्यात आला आहे .

Exit mobile version