बांभोरी येथील एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑनलाईन पालक मेळावा

जळगाव प्रतिनिधी । बांभोरी येथील एसएसबीटी महाविद्यालयात आज ऑनलाईन पालक मेळावा घेण्यात आले. मेळाव्याचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष  प्राचार्य  डॉ. के.एस .वाणी यांच्याहस्ते करण्यात आले. 

ऑनलाईन मेळाव्याला ३०० पालक ऑनलाईन उपस्थित होत. याप्रसंगी डॉ संजय शेखावत,  डॉ. जी.के. पटनाईक,  कार्यक्रमाचे समन्वयक प्रा कृष्णा श्रीवास्तव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उद्देश कार्यक्रमाचे समन्वयक  प्रा.कृष्णा श्रीवास्तव यांनी केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस पी शेखावत यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे कौतुक केले तसेच नवनवीन तंत्र कौशल्य आत्मसात करून महाविद्यालयामध्ये होणाऱ्या कॅम्पस प्लेसमेंट साठी तयार राहण्याचे आवाहन केले. महाविद्यालयाचे शिक्षण संचालक डॉ. जी के पटनाईक यांनी कोरूना काळात महाविद्यालयाने राबवलेल्या शैक्षणिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.

यावेळी योगेश गोविंद बारी, स्मिता निंबाळकर, कोमल शर्मा, उर्मिला सूर्यवंशी, ए. के. पाटील आणि रचना परमार या पालकांनी मनोगत व्यक्त केले. पालकांनी दिलेल्या सूचनांचे या वेळेची निरसन केले गेले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सारिका पवार व डॉ सरोज शेखावत  यांनी केले व  आभार प्रदर्शन परिषदेचे  सह समन्वयक  डॉ एन वाय घारे  यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ दीपक बघे, डॉ.सतपाल राजपूत, दिनेश पुरी, प्रा. डॉ.पी. पी. बोरनारे, प्रा नितीन जगताप, प्रा दीपमाला देसाई , प्रा मीरा देशपांडे, ज्ञानेश्वर परदेशी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content