Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल महाविद्यालयात हृद्‌यरोगावर ऑनलाईन व्याख्यान

यावल प्रतिनिधी । येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारकसह कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग व आयक्यूएसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हृदयरोग विषयावर ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रम प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात व्ही. व्ही. पाटील यांनी सांगितले की, जागतिक हृदय दिन ही एक जागतिक मोहिम आहे की, ज्यामुळे हृदयरोग व हृदयविकाराची जाणीव करून देते. ज्यामुळे प्रत्येकाने आपल्या हृदयाची काळजी कशी घ्यावी. याची जाणीव होते. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ.देवेंद्र पाटील( एम.डी.डी.एम, आँर्किड हाँस्पिटल.जळगांव ) यांनी हृदय रोग व हृदयविकार या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. हृदय रोगांमध्ये होणारे कोरोनरी आर्टेरी डिसीज संदर्भात अॅन्जीओग्राफी, अॅन्जीओप्लास्टी व बायपास कसे केले जाते. हे त्यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून समजावून दिले. तसेच व्यसनांपासून (धूम्रपान व मद्यपान) दूर राहून हृदयरोग टाळता येतो. हृदय रोगावर योगा व प्राणायाम करणे कसे फायद्याचे असते यावर मार्गदर्शन केले .अध्यक्ष प्रा. एस. आर. गायकवाड यांनी हृदय ट्रान्सप्लांट कसे व केव्हा सुरू झाले तसेच हृदय दान करणार्‍या व्यक्तीचे वय किती असावे याबद्दल मार्गदर्शन केले. ऑनलाईन कार्यक्रमाला बहुसंख्य  विद्यार्थी हजर होते.

कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन  व्ही. व्ही. पाटील यांनी केले. तसेच आभार उपप्राचार्य संजय पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार व प्रा. ए. पी. पाटील, डॉ. एस. पी. कापडे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

 

Exit mobile version