Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगाव येथे महाआवास ग्रामीण अभियानांतर्गत ऑनलाईन गृहप्रवेश कार्यक्रम

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील असंख्य बेघरांना महाआवास ग्रामीण अभियानांतर्गत घरकुल मिळाल्याने खासदार उन्मेष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती येथे ऑनलाईन गृहप्रवेश कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी लाभार्थ्यीला घराच्या चावीची प्रतिकृती देण्यात आले.

महाआवास ग्रामीण अभियान यशस्वी ठरल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच ऑनलाईन गृहप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच धर्तीवर चाळीसगाव तालुक्यात या अभियानांतर्गत ६ हजार पेक्षा जास्त घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यापैकी ४ हजार २३५ घरकुलांचे बांधकाम हे पूर्ण झाले आहे. या पाश्र्वभूमीवर पंचायत समिती येथे मंगळवार रोजी ऑनलाईन गृहप्रवेशाचा कार्यक्रम खासदार उन्मेष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला. महाआवास ग्रामीण अभियान व ग्रामीण विकास विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी रोहिदास सोनवणे, सुरेश गायकवाड, अनिल गायकवाड, विजय  गायकवाड, धरमसिंग पवार या पाच लाभार्थ्यांना घराची चावीची प्रतिकृती खासदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आली. लाभार्थी व अधिकारी यांत समन्वय नसल्याने बऱ्याच वेळा घरकुल मंजुरीची प्रक्रिया हि लाभार्थ्याला माहीत नसते. तसेच काही संधीसाधू हे लाभार्थ्यांची लुबाडणूक करतात. त्यामुळे अनेक जण हे शासकीय योजनांपासून वंचित राहतात. या शासकीय योजना ह्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दूत व्हावे असे आवाहन खासदार उन्मेष पाटील यांनी यावेळी केले. 

गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी आपल्या प्रस्ताविकेत या शासकीय योजनांमुळे लाभार्थ्यांच्या जिवनात नावीन्यपूर्ण बदल होत असून तालुक्यात सर्वात अधिक लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यास मी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे अधिकारी व पदाधिकारी यांच्या सहकार्याची मला गरज असल्याचे प्रतिपादन गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी सुतोवाच केले. माजी सभापती संजय पाटील यांनी आपल्या मनोगतात  खासदार उन्मेश पाटील हे आमदार असताना मागील पाच वर्षात झपाट्याने काम करीत तालुक्याचा सर्वांगीण विकास केला. गोरगरीब जनतेला शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देत समाधानकारक शासकीय शिबिर योजनांचे कार्यक्रम आयोजित करून त्याबाबत माहिती देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असो वा शेकडो रूग्णांना जीवनदान देणारे महात्मा फुले जन आरोग्य संकुल ट्रॉमा केअर सेंटर असो.  त्यांच्या विकासाचा झंझावात पाहिल्यानंतर आमच्यासारखे पदाधिकाऱ्यांची मान देखील अभिमानाने उंच होत. त्यांच्या शुभहस्ते लाभार्थ्यांना ई-गृह प्रवेशाची चावी प्रदान होत असल्याचा आनंद असल्याची भावना माजी सभापती संजय पाटील यांनी व्यक्त केली. खासदार उन्मेश पाटील हे पुढे  म्हणाले की गटविकास अधिकारी वाळेकर हे अतिशय कार्यतत्पर व अभ्यासू असुन पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शेवटच्या घटकाला लाभ मिळण्यासाठी ते झटत आहेत.

यावेळी गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पंचायत समितीचे सहाय्यक बिडिओ अजित पवार, पंचायत समिती उपसभापती भाऊसाहेब पाटील, माजी सभापती संजय पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब खंडू जाधव, माजी प.स. सदस्य कारभारी पवार, जिभाऊ पाटील, सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक अविनाश करपे, पाटणा गावाचे सरपंच नितिन चौधरी, किरण मालाजंगम, मनोहर गांगुर्डे, विस्तार अधिकारी आर.आर. पाटील , के.एन.माळी, दिगंबर शिर्के, माजी सरपंच गोरख राठोड, राजुभाऊ पगार, बंडूदादा पगार, बबडी शेख, माजी सरपंच अभिमन्यू शास्त्री, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र काका जैन,माजी सरपंच रवीआबा राजपूत, समकित छाजेड, राकेश कोतकर , कैलास गावडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version