Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात ऑनलाईन गुरुपौर्णिमा साजरी

जळगाव प्रतिनिधी । डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथे राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत ऑनलाईन गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाचे डॉ.पी.एस.सपकाळे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शैलेश तायडे यांनी प्रतिमेस मार्ल्यापण करुन वंदन केले.

यावेळी डॉ.पी.एस.सपकाळे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवकांना गुरुंचे महत्व पटवून दिले. अध्यक्षीय भाषणात डॉ.शैलेश तायडे यांनी आजच्या जीवनात गुरुंचे महत्व हळुहळु कमी होत चालले असल्याचे सांगत त्यासाठी स्वयंसेवकांनी गुरु बद्दलची धारणा बदलायला हवी, त्यांनी दिलेले ज्ञान आत्मसात करायला हवे आणि गुरुंची जाणिव ही प्रत्येकालाच असायलाच हवी असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी स्वयंसेवक भुषण चौधरी, श्‍वेता शेंडे, जयश्री बोके यांनी ऑनलाईनद्वारे गुरुपौर्णिमेबद्दल मनोगत व्यक्‍त केले. कृषी महाविद्यालयाच्या कार्यक्रम अधिकारी प्रा.वैशाली राणे यांनी सूत्रसंचालन तर आभार प्रा.शुभम गोदरे यांनी मानले. कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ.कुशल ढाके, कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्रा.यशोदिप पवार, उपप्राचार्य प्रा.प्रविण देवरे यांच्यासह प्राध्यापक वृंद शिक्षकेत्‍तर कर्मचारी उपस्थीत होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.आर.डी.चौधरी, मधुकर पांगळे, जयंत तळेले, रेखा कोळी यांनी सहकार्य केले.

डॉ.उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

डॉ.उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. गुगलमीटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

यावेळी व्यासपीठावर  डॉ.पी.आर.सपकाळे, डॉ.एस.सी.तायडे, प्रा.कुशल ढाके, प्रा.प्रविण देवरे, प्रा.यशोदिप पवार उपस्थीत होते. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्‍तर कर्मचारी उपस्थीत होते. यावेळी प्राचार्य डॉ.पी.आर.सपकाळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच डॉ.एस.सी.तायडे यांनी सुद्धा मनोगत व्यक्‍त केले. कार्यक्रमोच सूत्रसंचालन सागर पोखरकर याने तर आभार प्रथमेश गांमुर्डे यांने मानले.

 

 

Exit mobile version