Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘रोजगार संधी’ विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन

जळगाव प्रतिनिधी । राज्यातील युवक-युवतींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयामार्फत उद्या (दि.६) रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत कौशल्यातून रोजगार (मत्स्य व्यवसाय, रेशीम उद्योग तसेच कृषी संबंधित व्यवसाय या क्षेत्रात रोजगाराच्या संधी) या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

या मार्गदर्शन शिबिरात श्री. नितीन सावत, सहयोगी प्राध्यापक तथा मत्स्यशास्त्रज्ञ (मत्स्यसंवर्धन व शोभिवंत मत्स्यपालन विषयतज्ञ) मत्स्य संशोधन व संवर्धन प्रकल्प, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे, ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग यांचे दुपारी 3.00 ते 3.30 या वेळेत, श्री. डॉ. अधिकराव धनाजी जाधव, समन्वयक, सेंटर ऑफ एक्सलन्स अँड इनक्युबेशन इन सेरीकल्चर, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचे दुपारी 3.30 ते 4.00 या वेळेत श्री. आकाशचंद्र गौरठाकूर, मुख्य कार्यकारी अधिकारी, आकाश अग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. डायरेक्टर, फायनान्स इन्फ्रास्ट्रक्चर, आकाश एग्री प्रा. लि. दुपारी 4 ते 4.30 या वेळेत तर दुपारी 4.30 ते 5.00 या वेळेत प्रश्नोत्तरे घेण्यात येणार आहे.

या मागदर्शन सत्रात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक व युवतींनी खालील लिंकव्दारे सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने केले आहे.

फेसबुक – https://www.facebook.com/MaharashtraSDEED

युट्युब – https://www.youtube.com/channel/UC7o2gQB5q7VaITABN4FHw1A

 

Exit mobile version