यावल महाविद्यालयात ऑनलाईन जागतिक दहशतवाद व्याख्यान

यावल प्रतिनिधी । येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारकसह समाजाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग व आय. क्यू. ए. सी. विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दहशतवाद व्याख्यान ऑनलाइन आयोजित करण्यात आले होते.

प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक दहशतवाद कार्यक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला  मनोज पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले की, ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरीकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवादी हल्ला झाला होता त्यानिमित्ताने सदर कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक  प्रशांत निंबाजीराव बागूल ( शिक्षक, श्रीमती हि.गो.श्राँफ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय .नंदुरबार ) यांनी कार्यक्रमात  जागतिक दहशतवाद आज अनेक राष्ट्रांसमोर असलेले मोठे आव्हान आहे. दहशतवादाची समस्या मानवतेसाठी भयानक संकट झालेले आहे असे मार्गदर्शन केले व कार्यक्रमाचे अध्यक्ष शेखर चव्हाण सर यांनी जागतिक दहशतवाद विषयी  वर्तमान स्थितीतील आपले विचार व्यक्त केले व जगात सर्व ठिकाणी दहशतवादाने जो धुमाकूळ घातलेला आहे त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्व जगाने एकत्रित येण्याची गरज आहे असे मत मांडले. ऑनलाईन कार्यक्रमाला बहुसंख्य  विद्यार्थी हजर होते.

सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रा.डॉ. एस. पी. कापडे व प्रा. एस. आर. गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन  मनोज पाटील सर यांनी केले तसेच आभार  प्रविण पाटील सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी उपप्राचार्य प्रा. एम डी. खैरनार, प्रा. ए. पी. पाटील, संजय पाटील सर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

 

Protected Content