Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चिंचोली येथील तरूणाची ऑनलाईन फसवणूक

जळगाव  – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील एका तरुणाच्या बँक खात्यातून १ लाख ९० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रविवारी ३० ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील प्रमोद नामदेव पाटील (वय-३९) हे खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात.  २७ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजता त्यांच्या मोबाईल नंबरवर एका अनोळखी नंबरवरून युनो केवायसी अपडेट करण्यासंदर्भात लिंक पाठवण्यात आली होती. त्यांनी ती लिंक ओपन केल्यानंतर दिलेल्या फॉर्ममध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड आणि मोबाईलवरील ओटीपी नंबर भरला काही वेळानंतर त्यांच्या खात्यातून परस्पर १ लाख ९० हजार रुपये याचा व्यवहार झाल्याचे समोर आले. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी रविवार ३० ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख करीत आहे.

 

Exit mobile version