Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

Online fraud : फ्लिपकार्टच्या वॉलेटवरुन तरूणाची ऑनलाईन फसवणूक

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तरुणाच्या फ्लीककार्टच्या वॉलेटवरुन परस्पर खरेदी करुन त्याची ऑनलाईन २९ हजार ७९७ रुपयांत ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याबाबत रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, त्र्यंबक नगरातील विश्वजीत अपार्टंमेंट येथे तेजेश्वरराव गोकूळ पाटील वय ३२ हे वास्तव्यास आहेत. तेजेश्वरराव यांच्या फ्लीककार्टच्या वॉलेटवरुन परस्पर खरेदी केली, अशाप्रकारे तब्बल २९ हजार ७९७ रुपयांत संबंधितांनी ऑनलाईन खरेदी करुन फसवणूक केली. २ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास संबंधितांनी ही खरेदी केली होती असे समोर आले. फसवणुक झाल्याची खात्री झाल्यावर तेजेश्वरराव यांनी बुधवार, २० एप्रिल रोजी रामानंदनगर पोलिसात तक्रारी दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रवीण जगदाळे हे करीत आहेत.

Exit mobile version