Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात तरूणाची ऑनलाईन फसवणूक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भिकमचंद जैन हौसिंग सोसायटीत राहणाऱ्या तरुणाच्या क्रेडीटकार्डवरुन परस्पर व्यवहार करुन २४ हजार ७०२ रूपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील भिकमचंद जैन हौसिंग सोसायटी येथील नितीन मनोज जैन (वय-२२) हा तरूण वास्तव्याला आहे. त्याचे कोर्ट चौकातील कृषक भवन येथील एमआयच्या मोबाईल स्टोअर दुकानात कामाला आहे. त्यांच्याकडे आर.बी.एल कंपनीचे क्रेडीट कार्ड असून त्यावर त्यांनी व्यवहार केले आहेत. शनिवार १८ जून रोजी सायंकाळी ६.५२ वाजेच्या सुमारास ते दुकानात असतांना त्यांच्या मोबाईलवर क्रेडीटकार्डवर बिल जनरेट झाल्याचा मॅसेज आला. त्यांनी हा मॅसेज बघितला असता १३ जून रोजी त्यांच्या क्रेडीट कार्डवरुन अज्ञात इसमाने २४ हजार ७०२ रुपयांची खरेदी केल्याचे त्यांना समजले. त्यांनी बँकेला आपली फसवूणक झाल्याबाबत मेलद्वारे तक्रार केली. यावर बँकेकडून त्यांना पोलिसात तक्रार करण्याबाबत सांगितल्याने त्यांनी शहर पोलिसात रविवारी १९ जून रोजी सायंकाळी धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version