Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

केसीई सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त ऑनलाइन करिअर गायडन्स सिरीज

 

जळगाव, प्रतिनिधी । विद्यार्थ्यांना बारावी नंतर कोणत्या क्षेत्राची निवड करावी हा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर असतो  व त्यामुळे योग्य निर्णय घेणे त्यांना ऐनवेळी कठीण जाते. यासाठी केसीई सोसायटीच्या वतीने सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज यांच्या वतीने इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना करियर गार्डन्स देण्यासाठी ऑनलाइन सीरिज सुरु करण्यात आलेली आहे.

विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील उपलब्ध संधी कोण- कोणत्या याविषयी योग्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याच सिरीजचा एक भाग  दिनांक २२ सप्टेंबर रोजी फूड टेक्नॉलॉजी आणि न्यूट्रिशन या विषयावर घेण्यात आला. ज्यामध्ये इटली येथील तुषार कुलकर्णी जे प्रसिद्ध बायोलॉजिस्ट आहेत तसेच साऊथ अमेरिका येथील जॉर्ज रिवेरा जे फुड इनोव्हेटर म्हणून कार्यरत आहेत. या दोघही तज्ञांनी विद्यार्थ्यांना फूड टेक्नॉलॉजीतील पुढील विविध संधी व त्यामध्ये करता येणारे करियर या विषयी विशेष मार्गदर्शन केले.

या ऑनलाईन करिअर गायडन्स सिरीजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना माहिती तर मिळालीच सोबतच त्यांच्या मनातील शंकांचे सविस्तर निरसन देखील तज्ज्ञांमार्फत केले गेले. या ऑनलाईन करिअर गायडन्स सिरीजचा लाभ मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी ऑनलाइन रित्या उपस्थित राहून घेतला.

या करिअर गायडन्स  सीरिजच्या आयोजनासाठी केसीई सोसायटीच्या ओरियन . सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या उपप्राचार्य माधवीलता सित्रा यांनी विशेष महत्वाची भूमिका पार पाडली. तसेच ओरियन सीबीएसई स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या सुषमा कंची यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील करिअरसाठी आणखी योग्यरीत्या माहिती उपलब्ध होईल या हेतूने विविध क्षेत्रातील उपलब्ध संधी व  त्याविषयी मार्गदर्शन याचे आयोजन या ऑनलाइन करिअर गायडन्स सिरीज च्या माध्यमातून केलेले आहे.

Exit mobile version