Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शनीपेठ परिसरातून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव प्रतिनिधी ।  शनिपेठ परिसरातील चंदवाडी भागात  घरासमोर लावलेली ४० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्‍यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

शनिपेठेतील मायक्कादेवी मंदिराजवळील चंदनवाडी येथे देवेंद्र प्रल्हाद चौधरी (वय-४०) वास्तव्यास आहे. १३ जानेवारी रोजी रात्री  १२.३० त्यांनी त्यांची दुचाकी (एमएच.१९.सीएल.८३८८) ही घराजवळ उभी केली होती. दरम्यान, मध्यरात्री अज्ञात चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली. १४ जानेवारीला सकाळी ६ वाजेच्या सुमारास चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर त्यांनी दुचाकीचा शोध घेतला ती मिळून आली नाही. दुचाकी आढळून न आल्याने अखेर गुरूवार २६ मार्च रोजी रात्री उशीरा दोन महिन्यानंतर देवेंद्र चौधरी यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरूध्‍द शनिपेठ पोलीस ठाण्‍यात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मनोज येऊलकर करीत आहे.

 

Exit mobile version