Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निमखेडी शिवारातून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव प्रतिनिधी । निमखेडी शिवारातून एकाची दुचाकी लांबविल्याप्रकरणी जळगाव तालुका पोलीसात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गिरीष दत्तात्रय  बोरणारे (वय-५०) रा. नितीन साहित्या अपार्टमेंट निमखेडी शिवार जळगाव हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ते ईलेक्ट्रिकचे कामे करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. (एमएच १० बीसी ७६४०) ही त्यांची मालकीची दुचाकी आहे. २३ नोव्हेंबर रोजी रात्री त्यांनी दुचाकी त्यांच्या घराच्या पार्कींगमध्ये लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्याने १५ हजार रूपये किंमतीचा दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार २४ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीला आला. गिरीष बोरणारे यांनी दुचाकीचा शोधाशोध केली परंतू दुचाकी आढळून आली नाही. दोन महिन्यानंतर अखेर सोमवारी १७ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता तालुका पोलीसात धाव घेवून अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल मोरे करीत होते.

Exit mobile version