Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नशिराबाद येथून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव प्रतिनिधी । नशिराबाद रोडवर कामाच्या निमित्ताने आलेल्या वरणगाव येथील तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना उघडकीला आली. नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, कुलदीप मुगुतराव देशमुख (वय-३३) रा. शिवाजी चौक जळगाव हे खासगी नोकरी करून उदरनिर्वाह करतात. कुलदीप हे कामाच्या निमित्ताने १९ मे रोजी सकाळी १० वाजता नशिराबाद येथील कपुर पेट्रोल पंपाजवळ दुचाकी (क्रमांक एमएच १९ टीएम ९९४९) ने आले. एक तासानंतर काम आटोपून घरी परत जाण्यासाठी दुचाकीजवळ आले असता दुचाकी मिळून आली नाही. परिसरात शोधाशोध करूनही दुचाकी मिळाली नाही. कुलदीप देशमुख यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुधीर विसपुते करीत आहे.

Exit mobile version