Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाबळ परिसरातून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील महाबळ परिसरातून एकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की,  प्रमोद दत्तू खरोटे (वय-४२) रा. हरीओम नगर असोदा रोड जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ते महाबळ परिसरात नोकरीला आहे. २ मार्च रोजी सकाळी ८ वाजता नेहमीप्रमाणे दुचाकी (एमएच १९ एडी ६९८५) ने महाबळ परिसरात कामाला गेले. महाबळ येथील विद्यूत नगरी येथे त्यांनी त्यांची दुचाकी पार्क करून लावली होती. रात्री ८ वाजता काम आटोपून ते दुचाकीजवळ आले असता त्यांना जागेवर दुचाकी आढळून आली नाही. त्यांनी परिसरात दुचाकीचा शोध घेतला परंतू कोठेही आढळून आली नाही. ३ मार्च रोजी दुपारी २ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विजय खैरे करीत आहे.

 

Exit mobile version