Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फैजपूर शहरातून एकाची दुचाकी लांबविली

फैजपूर ता. यावल प्रतिनिधी । शहरातील मिरची मैदान परिसरातून एकाची २० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या संदर्भात माहिती अशी की,  मिलींद अरूण चौधरी (वय-३८) रा. जानकी नगर यावल हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला असून ते रेल्वेत नोकरीला आहे. त्याच्याकडे (एमएच १९ सीए ९२५५) क्रमांकाची दुचाकी आहे. त्याचे मोठा भाऊ तुषार चौधरी यांची मुलगी आजारी असल्याने तुषार यांनी भाऊ मिलींद चौधरी यांच्या दुचाकीने मुलीला रविवारी १६ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता दुचाकीने शहरातील मिरची मैदानाजवळ असलेले डॉ. प्रशांत वायकोळे यांच्या दवाखान्यात गेले. दुचाकी दवाखान्यासमोर पार्किंग करून लावली. मुलीवर उपचार घेतल्यानंतर तुषार चौधरी हे दुचाकीजवळ आले असता त्यांना भावाची दुचाकी आढळली नाही. त्यांनी मित्रांसह दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला पंरतू कोठेही दुचाकी मिळाली नाही. मंगळवारी १८ जानेवारी रोजी तुषार चौधरी यांचे भाऊ मिलींद चौधरी यांनी फैजपूर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अमजद खान पठाण करीत आहे.

Exit mobile version