Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बसस्थानक आवारातून एकाचा महागडा आयफोन लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव बसस्थानक आवारातून एका प्रौढ व्यक्तीचा ६० हजार रूपये किंमतीचा महागडा आयफोन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी सकाळी ११ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमृतसहर येथे राहणारे विशाल चढ्ढा वय ४६ हे खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करत असतात. कामाच्या निमित्ताने शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता जळगाव बसस्थानक आवारात आलेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या जवळील ६० हजार रूपये किंमतीचा आयफोन हा महागडा मोबाईल चोरून नेला. मोबाईल चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी बसस्थानक परिसरात सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर सकाळी ११ वाजता त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नरेश सोनवणे हे करीत आहे.

Exit mobile version