Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गुजराल पेट्रोलपंपाजवळून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गुजराल पेट्रोल पंपाजवळून एका तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २९ मे रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी ६ जून रोजी दुपारी १ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, किशोर नारायण पाटील वय ३२ रा. खोटे नगर, जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. २९ मे रोजी रात्री ८ वाजता किशोर पाटील हा त्याची दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीजी ७२९३) ने गुजराल पेट्रोल पंपाजवळ आलेला होता. त्यावेळी त्याने तिथेच दुचाकी पार्क करून लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. त्याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकीबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर गुरूवार ६ जून रोजी दुपारी १ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विनोद भोळे हे करीत आहे.

Exit mobile version