Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जयकिसन वाडी परिसरातून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील जयकिसन वाडी परिसरातून एकाची दुचाकी चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दुपारी ३ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात राहण्यात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, दत्तात्रय यशवंत कुलकर्णी (वय-५०, रा.द्रोपती नगर जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ते जयकिशनवाडी परिसरात अकाउंटंट म्हणून काम करतात. मंगळवार १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ते त्यांची दुचाकी (एमएच १९ सीई ९४७४) ने आले. त्यावेळी ऑफिस समोर त्यांनी दुचाकी पार्क केली.

अज्ञात चोरट्याने ही दुचाकी चोरून नेल्याचे सकाळी १० वाजता समोर आले. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, परंतु दुचाकी कुठेही मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी दुपारी ३ वाजता शहर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश भांडारकर करीत आहे.

Exit mobile version