Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हॉटेल राजयोग येथून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी  | जळगाव शहरापासून जवळ असलेल्या शिरसोली रोडवरील हॉटेल राजयोग येथून एकाची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ३१ ‍डिसेंबर रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी बुधवारी १० जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, पवनकुमार मोहनलाल पंजाबी वय ४४ रा. गायत्री नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. स्पेअर पार्ट दुकान चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. रविवारी ३१ डिसेंबर रोजी रात्री ११.३० वाजता ते शिरसोली रोडवरील हॉटेल राजयोग येथे कामाच्या निमित्ताने दुचाकीने क्रमांक एमएच १९ बीके ३९९३ ने आलेले होते. त्यावेळी त्यांनी त्यांची दुचाकी दुकानाच्या समोर पार्क करून लावलेली होती.

दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकीबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर बुधवारी १० जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे हे करीत आहे.

Exit mobile version