Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दारूसाठी पैसे न दिल्याने एकावर धारदार शस्त्राने वार

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील रामेश्वर कॉलनी येथे दारूसाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून दोन जणांना मारहाण केली तर एका तरूणावर तिक्ष्ण हत्याचाराने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील रामेश्वर कॉलनी येथील कपील आनंदा नावडे (वय-२३) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे.  गुरूवार १७  मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गल्लतील रितेश उर्फ चिचा किसन शिंदे रा. रामेश्वर कॉलनी हा कपील नावडे यांचे वडील आनंदा लहानू निवडे यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पैसे देण्यास नकार दिल्याने संशयित आरोपी रितेश शिंदे याने आनंदा नावडे यांना शिवीगाळ करून चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत कपील नावडे याने मारहाण केल्याचा जाब विचारला असता संशयित आरोपी रितेश किसन शिंदे याने कपीलला धारदार शस्त्राने वार करून जखमी केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. कपील नावडे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी रितेश किसन शिंदे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोकॉ संजय धनगर करीत आहे.

 

 

 

Exit mobile version