Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विषारी औषध घेतलेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील सतखेडा येथील ५० वर्षीय व्यक्तीने विषारी औषध सेवन केल्याची घटना घडली होती. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लक्ष्मण खजान बारेला वय ५० रा. सतखेडा ता. धरणगाव असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील सतखेडा येथे लक्ष्मण उर्फ रामसिंग खजान बारेला हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. १० जानेवारी रोजी रात्री १० वाजता त्यांनी विषारी औषध घेतले. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना बुधवारी १८ जानेवारी रोजी रात्री १० वाजता मृत्यू झाला. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ नितीन पाटील हे करीत आहे.

Exit mobile version