Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

टायर फुटल्याने वाहन पलटी होवून एकाचा दबून मृत्यू

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वरणगाव रोडवर सोसायटी वाईन शॉप जवळ टायर फुटल्याने कार पलटी होऊन एकाचा दबून मृत्यू झाल्याची घटना रविवार दुपारी घडली. सुनील जगन्नाथ पाटील वय-४४, रा दत्तनगर भुसावळ असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वरणगाव रोडवरील सोसायटी वाईन शॉप समोर वाहन क्रमांक (एमएच १९ सिटी ९८३९) हे घेऊन सुनील पाटील हे जात होते. त्यावेळी त्यांच्या गाडीचे टायर अचानक फुटल्याने वाहन पलटी झाले. त्यात त्यांचा दाबून मृत्यू झाल्याची घटना रविवारी २४ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजता घडली होती. या संदर्भात रात्री ८ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले. या कथेचा पुढील तपास पोलीस नाईक शशिकांत तायडे हे करीत आहे.

Exit mobile version