Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाईपच्या बंडलाची चोरी करतांना एकाला रंगेहात पकडले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसीतील एका कंपनीच्या बाहेर ट्रकमधून गार्डन पाईपची चोरी करतांना एकाला रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

याबाबत अधिक माहिती अशी की, बलविरसिंग जयश्रीराम यादव (वय-३८) रा. बगीयापूर जि. भिंड (मध्यप्रदेश) ह.मु. लक्ष्मी पाईप, एमआयडीसी, जळगाव हा तरूण नोकरीला आहे. आहे. शनिवार २८ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास दगडू सुकलाल पवार (वय-३५) रा. मच्छीबाजार, सुप्रिम कॉलनी हा कंपनीआयशर क्रमांक (एमएच १९ सीडब्ल्यू ५२३८) ट्रक त्याने कंपनीच्या कंम्पाऊंच्या बाहेर उभार केला. कंपनीचे गार्डन पाईचे बंडल आयशर गाडीतून टाकून चोरून नेत असतांना बलविरसिंग यादव यांनी रंगेहात पकडले. याप्रकरणी बलविरसिंग यादव यांनी रविवारी २९ मे रोजी रात्री दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी दगडू सुकलाल पवार याच्या विरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राजपूत करीत आहे.

Exit mobile version