Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कारण नसतांना एकाला अज्ञात तिघांकडून बेदम मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील नेहरु चौकात फिरोज खान बिसमिल्ला खान (वय-४४, रा. शाहू नगर, जळगाव) यांना ३ अज्ञातांनी कोणतेही कारण नसताना शिवीगाळ करत मारहाण केली. यात एकाने खान यांच्या चेहऱ्यावर फायटरने वार केल्याने त्यांना दुखापत केल्याची घटना बुधवारी १० जानेवारी रोजी रात्री घडली. याप्रकरणी गुरुवारी ११ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता शहर पोलिस ठाण्यात मारहाण करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्लंबर काम करणारे फिरोज खान हे बुधवार १० जानेवारी रोजी रात्री १० वाजता नेहरु चौक परिसरातून जात असताना तेथे ३ जण आले व त्यांनी फिरोज खान यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यासोबतच मारहाणदेखील केली व एकाने थेट फायटर काढून खान यांच्या चेहऱ्यावर मारला. त्यामुळे चांगलीच दुखापत झाली.

याप्रकरणी खान यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुरुवारी ११ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता मारहाण करणाऱ्या अज्ञात तीन जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक किशोर निकुंभ करत आहेत.

Exit mobile version