Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने एकाला उडविले

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील वाकोद ते पहुर गावाच्या दरम्यान हिवरी फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत पायी जात असलेले ४० वर्षीय व्यक्ती जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी १६ जानेवारी रोजी मध्यरात्री दीड वाजता घडली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनधारका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, शेख रफिक शेख मासूम वय-48 रा. दत्तनगर जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान ते कामाच्या निमित्ताने जामनेर तालुक्यातील वाकोद येथे गेले होते. सोमवारी १५ जानेवारी रोजी रात्री १० वाजता ते कामावरून निघून पायी जात होते. दरम्यान मंगळवारी १६ जानेवारी रोजी मध्यरात्री दीड वाजता सुमारास ते पायी चालत असताना त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहनधारक हा वाहन घेवून पसार झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात वाहनधारका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास सहाय्यक फौजदार रवींद्र देशमुख हे करीत आहे.

Exit mobile version