Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पैशांच्या वादातून एकाला लाकडी दांडक्याने मारहाण

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गिरणा पाण्याची टाकीजवळ पैशांचे देवाण घेण्यावरून एकाला दोन जणांकडून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून दुखापत करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात सोमवारी ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात २ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सुजित पुरुषोत्तम चौधरी (वय-४४) रा. नंदनवन नगर जळगाव हे आपले परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी १४ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शहरातील गिरणा पाण्याची टाकी जवळ ते उभे होते. त्यावेळी त्यांच्यात आणि सचिन अशोक येवले रा. पाचोरा तसेच राधेश्याम वसंत भामरे रा. रायसोनी नगर जळगाव या दोघांमध्ये वाद झाला. या वादानंतर सचिन येवले आणि राधेश्याम भामरे या दोघांनी सुजित चौधरी यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून शिवीगाळ केली. त्यानंतर दोघांनी जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर जखमी अवस्थेत सुचित चौधरी यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता सुजित चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन अशोक येवले आणि राधेश्याम वसंत भामरे या दोघांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनील पाटील करीत आहे.

Exit mobile version