Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

किरकोळ कारणावरून एकाला चौघांकडून मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  एका महिलेला मावशी बोलल्याचा रागातून अज्ञात चार जणांनी प्रौढ व्यक्तीला बेदम मारहाण व शिवीगाळ केल्याचा प्रकार शहरातील स्वातंत्र्य चौक येथे घडला आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हापेठ पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धनराज रामकृष्ण वाघ (वय-५५) रा. कंकराळा ता. सोयगाव जि.औरंगाबाद हे कामाच्या निमित्ताने सोमवारी २० जून रोजी जळगावात आले होते. दुपारी ४ वाजता शहरातील स्वातंत्र्य चौक येथे औरंगाबादकडे जाण्यासाठी वाहनाची वाट बघत होते. एका महिलेला त्यांनी मावशी म्हटल्याचा रागातून बाजूला उभी असलेली एका चार चाकी वाहनामध्ये बसलेल्या अज्ञात चार जणांनी बेदम मारहाण करून शिवीगाळ केली. दरम्यान धनंजय धनराज वाघ यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून मंगळवार २१ जून रोजी रात्री अज्ञात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय नारखेडे करीत आहे.

 

Exit mobile version