Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आव्हाणे येथे एकाने घेतला गळफास

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । ३५ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील आव्हाणे येथे घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रमोद भागवत पाटील वय ३५ रा. आव्हाणे ता.जळगाव असे मृत व्यक्तीचे नाव आहे. प्रमोद पाटील यांनी राहत्या घरी गुरुवारी गळफास राहून आत्महत्या केली. घटना लक्षात आल्यानंतर कुटुंबियांनी त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. भंगाळे यांनी त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी वैदृयकीय अधिकारी यांच्या खबरीवरुन तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक नयन पाटील हे करीत आहेत.

 

Exit mobile version