Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भरधाव दुचाकीच्या धडकेत एकजण गंभीर जखमी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रस्त्याने पायी जाणाऱ्या एकाला भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक देवून पायाला गंभीर दुखापत केल्याची घटना शहरातील जुनी पोस्टल कॉलनी येथे घडली आहे. याप्रकरणी अज्ञात दुचाकी चालकावर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामानंदनगर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  तुषार अनंत लढे (वय-५१) रा. जुनी पोस्टल कॉलनी, एम.जे. कॉलेजच्या मागे, जळगाव. हे बांधकाम व्यवसायिक आहे. ९ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास ते घरासमोरील रस्त्याने पायी जात असताना (एमएच १९ डिक्यू १४००) या दुचाकीने भरधाव वेगाने येवून तुषार लढे यांना जोरदार धडक दिली. या अपघातात तुषार यांचा उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. रविवार १० एप्रिल रोजी दुपारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तुषार लढे यांच्या फिर्यादीवरून  (एमएच १९ डिक्यू १४००) क्रमांकाच्या दुचाकीवरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल पाटील करीत आहे.

 

Exit mobile version