Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यातील एक जागा कि सत्ता महत्वाची : कॉंग्रेसचा शिवसेनेला सूचक इशारा

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्यसभेसाठी शिवसेनेसह भाजपा जागांसाठी अटीतटीवर असून भाजप माघार घेणार नसल्याचे स्पष्ट  आहे, तर दुसरीकडे काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला तर सत्ता जाईल, आणि त्याचसाठी काँग्रेसने एक जागा कि सत्ता महत्वाची असा शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार असून सेनेने दुसऱ्या तर भाजपाने तिसऱ्या उमेदवारीवर अडून आहेत.  त्यामुळे माविआच्या नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. एकीकडे कॉंग्रेसने राज्याबाहेरील उमेदवार दिल्याने कॉंग्रेसमध्ये नाराजी असून यातूनच मविआची मते फुटली तर कॉंग्रेसने लादलेल्या उमेदवाराचा पराभव होण्याची भीती आहे. दुसरीकडे आमदारांची मते फुटू नयेत यासाठी पक्षांनी व्हिप जारी केला असला तरी भाजपला मते देणाऱ्या आमदारांवर कारवाई होऊ शकत नाही, असे भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले असून सहाव्या जागेसाठी मतांची बेगमी झाली असल्याचेही फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.

यातूनच मविआची मते फुटली तर शिवसेनेने लादलेल्या दुसऱ्या आणि कॉंग्रेसच्या इम्रान प्रतापगढी या उमेदवाराचा पराभव होण्याची शक्यता आहे. आणि काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला तर काँग्रेस सत्तेतून बाहेर पडून राज्यातील सत्ता जाण्याची भीती आहे. इम्रान प्रतापगढी यांना काहीही करून निवडून आणा असा निरोप कॉंग्रेसच्या नेत्यांना असून त्यांच्याच आमदारांवर विश्वास नाही. बाहेरील लादलेल्या उमेदवारामुळे नाराज असंतुष्ट आमदारांची मते फुटण्याची दाट शक्यता कॉंग्रेसला आहे. आणि त्यामुळेच कॉंग्रेसने आपली नामुष्की होऊ नये यासाठी आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेनेने दिलेला दुसरा उमेदवाराच्या माघारीसाठी अप्रत्यक्षपणे दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे.

राज्यसभेची एक जागा महत्वाची कि सत्ता महत्वाची असा सूचक इशाराच कॉंग्रेसने शिवेसेनेला दिला आहे. आणि त्यामुळेच महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षाचे प्रतिनिधी फडणवीसांच्या बंगल्यावर भेटीसाठी गेले, परंतु तेथेही त्यांना निराशाजनक प्रतिसाद मिळाल्यामुळे महाविकास आघाडीत पेच निर्माण झालेला दिसून येत आहे.

Exit mobile version