Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संताजी कॉर्नर बायपास वरील धरणगाव चौफुलीवर अपघातात एक जण जखमी

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा शहराजवळील धरणगाव चौफुली संताजी कॉर्नर येथे राष्ट्रीय महामार्ग क्र. सहा वरील बायपासवर पुढे ट्रकवर पोकलैंड घेऊन जात असताना मागावून येणाऱ्या ट्रकने पोकलँडच्या सुपड्याला धक्का लागल्याने त्यातील चालक हा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

याबाबत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील बायपास असलेल्या धरणगाव रस्त्यावर घेऊन जळगावकडे जाणाऱ्या ट्रकला मागावून येणाऱ्या ट्रकची धडक झाल्याने त्यात पोकलेनच्या सुपड्याची धडक लागून त्यात ट्रक चालक गयनीनाथ नागरगोची बाबुराव (वय 30) राहणार बीड हा जखमी झाला. त्यास आशुतोष शेलार चालक यांनी घटनास्थळावरून तात्काळ जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या मोफत रुग्णवाहिकेत पारोळा कुटीर रुग्णालय येथे दाखल केले त्यांच्यावर डॉ जिनेन्द्र पाटील यांनी प्रथमोपचार करून पुढील रवाना करण्यात आले आहे. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात कुठल्याही प्रकारची नोंद नाही.

Exit mobile version