Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात महामार्गावर ट्रक उलटून एक जण जखमी

21f3f437 e0a4 40eb 8491 6c8bedb42cf4

जळगाव (प्रतिनिधी) धुळे येथून भुसावळकडे जाणारी एक ट्रक (क्र.एम.एच.१८, ए.ए. ९६३४) रात्री २.३० च्या सुमारास महामार्गावर शहरातील हॉटेल गौरव समोरील छोट्या पुलावरून खाली पडली. या घटनेत एक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्यावरून खाली पडल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

 

ट्रकमध्ये असलेल्या दोन जणांपैकी एक जण जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दुसऱ्यास किरकोळ दुखापत झाली असून तो ठणठणीत असल्याचे कळते.

Exit mobile version