Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रिंगरोड परिसरातून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील रिंगरोड परिसरातील एका बँकजवळून तरूणाची २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरट्यांनी लांबविली. जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, हरिविठ्ठल नगरातील रहिवासी सोमेश भटू कदम (वय-२५) हा तरुण १० मे रोजी जळगाव शहरातील रिंगरोड परिसरातील वैद्यनाथ सहकारी बँक परिसरात आला होता. यादरम्यान त्याने दुपारी १ वाजता वैद्यनाथ बँकेजवळ सार्वजनिक जागी त्याची (एमएच १९ सीएच १०५०) या क्रमांकांची दुचाकी उभी केली. काम आटोपून परतल्यावर दुपारी ४ वाजता परतल्यावर दुचाकी जागेवर दिसून आला नाही. सर्वत्र शोध घेवूनही दुचाकी मिळून न आल्याने सात दिवसानंतर सोमेश कदम याने शहर पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रफुल्ल धांडे हे करीत आहेत.

Exit mobile version