Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळनेरातून एकाची दुचाकी लांबविली; पोलीसात गुन्हा दाखल

अमळनेर प्रतिनिधी । शहरातील गजानन भागातून एका तरूणाची २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

अधिक माहिती अशी की, विजय रूपचंद पारे (वय-३९) रा. ढेकू रोड अमळनेर हे खासगी नोकरी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान गजानन नगरातील राहत्या घरासमोर २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी ८ मे रोजी दुपारी ३ ते सांयकाळी ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. विजय पारे यांच्या फिर्यादीवरून अमळने पर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेका बापू साळुंखे करीत आहे.

Exit mobile version