वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना हेक्टरी एक लाख रुपये  द्यावेत : निवेदन

रावेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्यात वादळी पावसामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले असून प्रत्येक शेतक-यांना हेक्टरी एक लाख रुपये भरपाई द्यावी तसेच पिक विमा कंपनीने शेतक-यांना शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे यांनी केली आहे.

वादळी पावसामुळे रावेर तालुक्यात केळीचे मोठे नुकसान झाले नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी आज भाजपा जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे रावेर तालुक्यात आले होते. त्यांनी पातोंडी पुनखेडा परीसरात नुकसान झालेल्या शेतक-यांशी संवाद साधला.

यावेळी त्यांच्या सोबत भाजपा किसान सभेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश धनके, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, भाजपा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, पद्माकर महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, माजी प स सदस्य पि के महाजन, हरलाल कोळी, संदीप सावळे, प्रल्हाद पाटील आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content