Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दोन दुचाकींच्या अपघातात एकजण जखमी; एमआयडीसीत गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसीत दुचाकीने कामावर जाणासाठी निघलेल्या दुचाकीधारकाला समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने दुचाकीधारक गंभीर जखमी झाल्याची घटना जळगाव औरंगाबाद रोडवर घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिल मोतीराम सोनवणे (वय-४२) हे एमआयडीसीतील एका कंपनीत कामाला आहे. सोमवारी १९ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ते त्यांच्या दुचाकीने एमआयडीसीत कामाला जाण्यासाठी निघाले. जळगाव-औरंगाबाद रोडवरून जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणारी (एमएच १९ बीझेड ४७७७) दुचाकी ने जोरदार धडक दिली. यात सुनिल सोनवणे हे दुर फेकले गेले. या अपघातात त्यांच्या हात, पाय व खांद्याला गंभीर दुखापत झाली. अपघात होताच समोरील दुचाकीधारक घटनास्थळाहून पसार झाला होता. सुनिल सोनवणे यांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अज्ञात दुचाकीचालविरोधात तक्रार दिली आहे. दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीसात अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय पाटील करीत आहे. 

Exit mobile version